fbpx

गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये स्मृती इराणी आघाडीवर?

Smriti Irani leading in race to be next Gujarat Chief Minister?

टीम महाराष्ट्र देशा: गुजरातच्या रणसंग्रामात अखेर भाजपचाच विजय झाला आहे. अटीतटीच्या झालेल्या गुजरात निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले आहे. यानंतर आता गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान कोण होणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळासह अवघ्या गुजरात वासियामध्ये सुरु झाली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्य नावासाठी आता चक्क स्मुर्ती इराणी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. पण या संदर्भात भाजपच्या गोटातून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही.

इराणी यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. मंडाविया हे पाटीदार समाजाचे नेते असून ते शेतकऱ्यांच्या जवळचे मानले जातात. पाटीदार आंदोलन आणि शेतकऱ्यांचे आंदोलन यामुळे भाजपपुढे मोठी डोकेदुखी निर्माण झाली होती. त्यामुळे मंडाविया यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असलेलं तिसरं नाव हे वजूभाई वाला यांचं आहे. वाला हे सध्याचे कर्नाटकचे राज्यपाल असून त्यांनी गुजरात विधानसभेचे अध्यक्षपद भूषवलं आहे. यापूर्वी ते गुजरातमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते, दांडगा अनुभव असल्याने त्यांना हे पद दिलं जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीत गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.