आणि स्मिथ ढसा ढसा रडला

smith

सिडनी: केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसले होते. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड केल्याचे मान्य केले होते. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे.

दरम्यान, मायदेशी परतल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने माफी मागितली होती. यावेळी स्मिथ ढसा ढसा रडला स्मिथप्रमाणेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार डेविड वॉर्नरने चाहत्यांची माफी मागितली आहे. वॉर्नरने एक ट्विट करताना ही माफी मागितली आहे ज्यात त्याने म्हटलंय की या प्रकरणामुळे क्रिकेट बदनाम झालं आहे, आणि आम्ही या कृत्याबद्दल माफी मागतो.

काय आहे प्रकरण?

ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.