fbpx

आर.आर.आबांची कन्या स्मिता पाटील मावळ मधून लोकसभा लढणार ?

टीम महाराष्ट्र देशा : मावळ लोकसभेला राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावासोबत आता आर.आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांचे नाव पुढे आले आहे.

अगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर स्मिता पाटील या मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार या मतदारसंघातून लोकसभेसाठी आग्रही होते. मात्र शरद पवार यांनी त्यांच्या नावाला नकार दिला असून आता स्मिता पाटलांचं नाव समोर आल्याचं कळतंय