समृध्दी बाधित शेतकरी करणार इच्छामरणाची मागणी !

samrudhi mahamargh

नाशिक: सरकार शेतकरी विरोधी भुमिका घेत असून समृध्दी महामार्गाकरीता जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात आहेत. मात्र यातून बागायती क्षेत्र वगळावे व भूसंपादन कायदा २०१३ची अंमलबजावणी करावी अशी शेतक-यांची मागणी आहे. मात्र सरकार शेतक-यांची मुस्कटदाबी करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असून २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेत सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेच्या निषेधाचा ठराव करून राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करण्याचा निर्णय समृध्दी बाधित संघर्ष समितीने घेतला आहे.

समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी पिकाऊ व बागायती जमीन संपादन करू नये व भूसंपादन कायदा २०१३ ची कायदेशीर कारवाई करावी यासाठी आंदोलन सुरू आहे मात्र मुख्यमंत्री या विषयी भेट देत नाही. आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पोलीस केसेस दाखल केल्या जात आहेत. मुख्यमंत्री समृद्धी बाधित शेतकरी आंदोलकांना दलाल म्हटले तसेच नाशिक येथे काळे झेंडे दाखवले म्हणून शेतकरी आंदोलकावर पोलीस खटले दाखल केले आहे.

Loading...

त्यादिवशी समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले यांना सकाळी ७ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले व मोबाईल जप्त केला व केस दाखल केली राज्यसरकार शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती देत नाही म्हणून दररोज आत्महत्या शेतकरी करत आहेत व समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आंदोलन करत असताना शासन दखल घेत नाही. या शेतकरी विरोधी धोरण विरोधात समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत आता आम्हाला इच्छामरणाची परवानगी राष्ट्रपतीनी द्यावी असा ठराव मांडून निषेध व्यक्त करणार आहेत. असे समृध्दी बाधित संघर्ष समितीच्यावतीने सांगण्यात आले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत