fbpx

Realme 3 Pro : बेस्ट कॅमेरा क्वालिटीचा स्मार्टफोन २२ एप्रिलला होतोय लॉन्च

टीम महाराष्ट्र देशा : येत्या २२ एप्रिलला रियलमीचा 3 Pro हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. कंपनी चे सीईओ माधव सेठ यांनी याबाबत ट्वीट करत याची घोषणा केली आहे.रियलमी च्या नवा स्मार्टफोनची टक्कर शाओमी च्या Redmi Note 7 Pro सोबत असणार आहे.

रियलमी ने यापूर्वी Realme 3 स्मार्टफोन लॉन्च केला होता ज्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. Realme 3 च्या तुलनेत या नव्या फोनचा कॅमेरा क्वालिटी उत्तम देण्यात येणार आहे. रियलमी 3 प्रो मध्ये 10एनएम ओक्टाकोर क्वालकॉम स्नैपड्रैगन 710 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. याचबरोबर तो २५ मिनिटांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करेल ही खासियत याची असेल. फोनची किमत १५ हजारांच्या आत असण्याची शक्यता आहे.