स्मार्ट सिटीचे केवळ गाजर? निधीअभावी प्रकल्प रखडले

narendra modi and smart city

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी यांचे सर्वांत मोठे सहा पायाभूत प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. नगरविकास खात्याच्या संसदीय स्थायी समितीच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. यामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाचा सुद्धा समावेश आहे. नगरविकास खात्याच्या संसदीय स्थायी समितीच्या अहवालानुसार रखडलेल्या प्रकल्पावर फक्त २१ टक्केच खर्च होऊ शकला आहे. प्रकल्पांसाठी ५.६ अब्ज डॉलरच्या निधीची तरतूद असताना केवळ १.२ अब्ज डॉलरच प्रत्यक्षात खर्च होऊ शकले.

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे वाजले बारा

‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प १.५ अब्ज डॉलरचा असून प्रत्यक्षातील खर्च अवघा २८ दशलक्ष डॉलर आहे. फक्त योजनेवर मंजूर निधीपैकी फक्त १.८ टक्के निधी खर्च होऊ शकला.
स्थायी समिती अध्यक्ष तथा बीजेडी खासदार पिनाकी मिश्रा यांनी सांगितले की, वचने तर खूप दिली गेली. योजनाही भरमसाट आखल्या गेल्या. प्रत्यक्षात मात्र फारसे आशादायक चित्र नाही. मोदी सरकारने योजना, आश्वासने तर खूप दिले मात्र निधीअभावी हे सर्व प्रकल्प रखडले आहेत. सरकारने मात्र समितीचे माहिती फेटाळून लावली आहे.