औरंगाबाद: गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाचा थेट परिणाम शहरातील स्मार्ट सिटी बससेवेवरही झाला आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीने शहरवासीयांच्या सुविधेसाठी सुरू केलेली स्मार्ट बस गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळ सोबत केलेल्या कराराचा फेरविचार केला जाणार असल्याची माहिती प्रशासक आस्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांनी (दि.३१)दिली.
शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्मार्ट सिटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने घेतला होता. त्यानुसार १०० बस खरेदी करण्यात आल्या. बस सेवा चालविण्यासाठी वाहक व चालक एसटी महामंडळाकडून घेण्यासंबंधी सामंजस्य करार २०१८ मध्ये करण्यात आला होता.
मात्र आता गेल्या दिड महिन्यांपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचा फटका शहर बसला बसला आहे. याविषयी पांडेय म्हणाले, नव्या वर्षात शहर बस स्वतंत्र केली जाईल. महामंडळ सध्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडचणीत आहे. त्याचा फटका शहर बसला बसला आहे. त्यामुळे शहर बससाठी स्वतंत्र कर्मचारी घेण्याचे नियोजन आहे. येत्या वर्षभरात सामंजस्य कराराचा फेर आढावा घेतला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचा एनसीबीवर हल्लाबोल
- महाराष्ट्रात कोरोनाची तीसरी लाट! “…तर ८० हजार मृत्यू”, अतिरिक्त मुख्य सचिवांचा खुलासा
- ‘… त्यामुळे छोटे मोठे पप्पू एकत्र येऊन कोल्हेकुई करताय’, भातखळकरांचा हल्लाबोल
- “…पंतप्रधानांविरुद्ध गरळ, उसना आव आणि म्याव म्याव”, भाजपची शिवसेनेवर खोचक टीका
- “म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची…”; सदाभाऊ खोतांची नवाब मलिकांवर बोचरी टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<