fbpx

सिक्स सीटरमध्ये झोपलेल्या दोन चिमुकलींवर ४५ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

पुणे:  सिक्स सिटरमध्ये झोपलेल्या चिमुकल्या तीन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या 45 वर्षाच्या नराधमास पोलिसांनी अटक केली. दोन चिमुकलींवर त्याने बलात्कार केला तर तिसऱ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करताना मुलींनी गोंधळ केल्यामुळे ती या प्रकारापासून वाचली. ही घटना येरवडा येथील नागपूर चाळ परिसरात रात्री 11 वाजता घडली. या प्रकरणी भवरलाल सखाजी रांगे (वय 45) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा पती आणि तीन मुली या पूर्वी लोहगाव येथे राहण्यास होते. तेथील कामावरून काढून टाकण्यात आल्यामुळे हे कुटुंब तेथील घर सोडून दिवसभर काम करून नागपूर चाळ मधील एका सिक्स सिटरमध्ये झोपत असत.घटनेच्या दिवशी रात्री फिर्यादी तिच्या आईकडे गेली होती आणि तिचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता.

फिर्यादीच्या वय आठ, नऊ आणि चार या तीन मुली त्यावेळी सिक्स सिटरमध्ये झोपल्या होत्या. आरोपी भवरलाल याने यापैकी दोन मुलींवर त्याने बलात्कार केला. तिसऱ्या 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करताना मुलींनी गोंधळ केल्यामुळे त्याचा हा प्रकार उघडकीस आला. येरवडा पोलिसांनी आरोपीला आज अटक केली.