संचारबंदी काळात उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या ‘कोरोना योद्ध्यांना’ चिमुकल्यांकडून सरबत

तुळजापूर – कोरोना पार्श्वभूमीवर सध्या संचार बंदी असताना ही बसस्टँन्ड परिसर व महामार्गावरील रस्त्यावर कडक उन्हात ड्युटी करणाऱ्या पोलिस तसेच स्वछता कर्मचाऱ्यांना ड्युटीचा जागेवर जावुन पञकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष महिपतरावा कदम यांच्या नातवंडांनी सरबत वाटप करुन असाह्य उकाड्यापासुन काही काळ त्यांची सुटका केली.

बुधवार दि १ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता कडक ऊन पडलेले, दुकाने बंद असल्याने पिण्यास पाणी उपलब्ध नाही अशा कडक संचार बंदीच्या काळात दोन मुले व तीन मुली असे पाच चिमुकले हातात ग्लास व भांड्यात सरबत घेवुन रस्त्यावर आले रस्त्यावर दिसणारे पोलिस, नगरपरिषद स्वछता कर्मचाऱ्यांना सरबत देत कोरोना योध्दांची तहान भागवताना दिसले.

रस्त्यावर सरबत वाटनाऱ्या या चिमुकल्या मुलांनी माणुसकिचे दर्शन घडवले. या चिमुकल्यांनी तेथुन पोलिस ठाणे गाठले. तिथे ड्युटीस असणाऱ्या पोलिस अधिकारी पासुन ते सर्व कर्मचाऱ्यांना स्वताचा हाताने ग्लास भरुन लिंबू सरबत दिले. चिमुकल्यांनी दिलेले लिंबू शरबत पिवुन पोलिस व स्वछृता कर्मचाऱ्यांनी त्यांना चाँकलेटला पैसे देवु करताच ते नाकारले. तसेच ‘तुम्ही चांगले काम करतात हे आम्हाला आजोबांनी सांगितले व तुम्ही ऊन्हात उभे असल्यामुळे आम्ही तुमाच्यासाठी सरबत करुन घेऊन आल्याचे आवर्जून सांगितले .

हेही पहा –