लघु-मध्यम उद्योगांनीही शेअर बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारावे- देसाई

Subhash-Desai,कोंबडी चोर नारायण राणे

मुंबई : लघु-मध्यम उद्योगांनी व्यवसायवृद्धी करण्यासाठी कर्ज घेण्यापेक्षा स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टींग करून भांडवल उभारण्यावर भर द्यावा. तसेच लिस्टींग केलेल्या कंपन्यांची मालकी ही मूळ मालकाकडे अबाधित राहते याबाबत प्रबोधन करुन येथे येण्यासाठी व्यावसायिकांचे मन वळवावे आणि मनातील गैरसमज दूर करावेत, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे 250 व्या एस एम ई कंपनीचे लिस्टींग करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

देसाई म्हणाले, राज्यात उद्योग स्नेही धोरण राबविण्यात येते आहे. याचा फायदा लघु-मध्यम उद्योजकांना होत आहे. आज लिस्ट झालेल्या 250व्या कंपनीसह इतर लघू व मध्यम उद्योगांनी आतापर्यंत सुमारे 2 हजार 300 कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे. ज्याचे व्यावसायिक मूल्य 21 हजार कोटी रुपये एवढे आहे. उद्योग वाढीसह यातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे. आज 250 वी कंपनी लिस्ट झाली असली तरी हे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. लघू व मध्यम व्यावसायिक ज्यांची 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल आहे अशा कोणत्याही कंपनीला यात सहभागी होता येते.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...