अनलॉकच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यात किंचित वाढ !

pune corona

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.

तर, राज्य सरकारच्या नव्या निर्देशांनुसार पुण्यात काही निर्बंधांसह अनलॉकला काल (दि ७ जून) पासून सुरुवात झाली आहे. काल पुण्यात दुसऱ्या लाटेतील नीचांकी नव्या कोरोना बाधितांचा आकडा नोंदवला गेल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज(८ जून) नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

पुणे शहरात आज नव्याने २९७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, शहरातील ५२९ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात आज नव्या कोरोना बाधितांमध्ये घट होण्यासह मृत्युसंख्येत देखील घट झाली आहे. आज कोरोनाने १२ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजारांच्या आत आली आहे. सध्या पुण्यात ३ हजार ६९९ सक्रिय रुग्ण असून ५८९ रुग्ण गंभीर तर १,१७८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या