fbpx

गुजरातमध्ये शहीद जवानाच्या मुलीला पोलिसांनी नेले फरफटत

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या १५ वर्षापासून शहीद जवानाच्या कुटुंबियांना सरकारने मदतीच आश्वासन देवूनही ते मिळत नसल्याने जाब विचारायला गेलेल्या शहीद जवानाच्या मुलीला अपमानास्पद वागणूक मिळाल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या प्रचारसभेत घडलेल्या या प्रकारामुळे काँग्रेस तसेच राहुल गांधी यांनी भाजपाला धारेवर धरल आहे.

मुख्यमंत्री विजय रूपानी यांची प्रचार सभा चालू असताना न्याय मागण्यासाठी बीएसएफचे शहीद जवान अशोक तडवी यांची मुलगी रूपल तडवी ही व्यासपीठाच्या दिशेने धावत गेली, आणि रूपांनी यांना भेटायचे आहे असे सांगू लागली. ती व्यासपीठाकडे जात असताना महिला पोलिसांनी तिला फरपटत दूर नेले. मात्र यानंतर आता घडल्या प्रकारामुळे कॉंग्रेसकडून भाजपवर कडाडून टिका केली जात आहे.

 

2 Comments

Click here to post a comment