मुंबई : पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अली फलंदाजांना बाद केल्यानंतर त्याच्या खास विकेट सेलिब्रेशनमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता हसन अलीचा क्रिकेटच्या मैदानावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ श्रीलंका आणि पाकिस्तान (SL vs PAK) यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघ सध्या पहिल्या कसोटी सामन्यात आमनेसामने आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये २८ वर्षीय हसन अली संघातील सहकारी खेळाडू हारिस रौफसमोर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हारिस रौफही हसन अलीच्या डान्सचा आनंद घेत आहे. रौफ या सामन्यात संघाचा भाग नाही. हसन अलीचा हा अनोखा डान्स पाहून हरिसलाही हसू आवरता येत नाही. तर दुसरीकडे समालोचक डॅनी मॉरिसनही हसन अलीचा हा डान्स पाहून अवाक झाला आहे. डॅनी म्हणतो की हसन अली त्याच्या बॉलिंग अॅक्शनमध्ये थोडा पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.
श्रीलंकेच्या पहिल्या डावात २२२ धावा
पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत २२२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून दिनेश चंडिमलने सर्वाधिक ७६ धावा केल्या तर महिश तिक्षनाने ३८ धावांचे योगदान दिले. सलामीवीर ओसाद फर्नांडो ३५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर कुशल मेंडिसने २१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने ४ तर हसन अली आणि यासिर शाहने २-२ बळी घेतले होते.
Hassan Ali's back!!!!
pic.twitter.com/WoQjdftQmQ— Ramiya 2.0 (@yehtuhogaaa) July 16, 2022
बाबरचे शतक, पाकिस्तान पहिल्या डावात ४ धावांनी पिछाडीवर
श्रीलंकेने पहिल्या डावात केलेल्या २२२ धावांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तान संघाने पहिल्या डावात २१८ धावा केल्या होत्या. यजमान श्रीलंकेला पहिल्या डावाच्या जोरावर चार धावांची आघाडी मिळाली होती. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने ११९ धावांची शानदार खेळी केली. श्रीलंकेकडून फिरकीपटू प्रभाद जयसूर्याने सर्वाधिक ५ बळी घेतले. सध्या या सामन्यातील दुसऱ्या डावात श्रीलंका ३६ धावांवर १ गडी बाद अशा स्थितीत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Fish । बीडमधील केजडी नदीला माशांचा महापूर; मासे पहायला स्थानिकांची गर्दी
- KL Rahul : केएल राहुल वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी करतोय कसून सराव; पाहा ‘हा’ VIDEO!
- Cobra snake | कोब्रा नाग अडकला मच्छिमाऱ्यांच्या जाळ्यात
- Neelam Gorhe : ‘जे लोक गेलेले आहेत, त्यांचा…’; नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं
- Deepali sayed | “…त्यासाठी मला संजय राऊतांची परवानगी घ्यायची गरज नाही”- दीपाली सय्यद
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<