मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे यावर्षी ४ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. आता दिवंगत ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर वॉर्नला श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेटने घेतला आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया (SL vs AUS) यांच्यातील पहिला कसोटी सामना २९ जूनपासून गाले येथे सुरू होणार असून त्याआधी शेन वॉर्नला सन्मानित करण्यात येणार आहे. श्रीलंका क्रिकेटने निर्णय घेतला आहे. वॉर्नने डिसेंबर २००४ मध्ये सुनामीच्या वेळी मोठे योगदान दिले आणि पीडितांना भरपूर मदत केली होती.
मार्च २००४ मध्ये, शेन वॉर्नने गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्याच्याकसोटी कारकिर्दीतील ५००वी विकेट देखील घेतली होती. त्यानंतर त्याने हसन तिलकरत्नेला आपला ५००वा बळी बनवले. शेन वॉर्न आपल्या मित्रांसोबत थायलंडमध्ये सुट्टीवर गेला होता, तिथे तो हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळला.
Sri Lankans will stand to attention in a fitting salute to all-time cricketing great Australian spin wizard Shane Warne when the first Test between Sri Lanka and Australia gets underway on June 29 at the Galle.#SLvAUS https://t.co/xOOfVksvdA
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 27, 2022
वॉर्नने निवृत्तीनंतर ब्रॉडकास्टर आणि क्रिकेट तज्ज्ञाची भूमिका स्वीकारली. शेन वॉर्नची कारकीर्द अप्रतिम होती. मुथय्या मुरलीधरननंतर कसोटी क्रिकेटमध्ये १०००हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला. श्रीलंकेचे पर्यटन मंत्री हरिन फर्नांडो यांच्या म्हणण्यानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओने सांगितले, की शेन वॉर्नचे कुटुंब सामना पाहण्यासाठी मैदानावर त्यांची उपस्थिती दर्शवेल.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<