मुंबई : श्रीलंकेचा कप्तान दासून शनाकाने आपल्या टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यामध्ये (SL vs AUS) शनाकाने नाबाद अर्धशतक झळकावून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. श्रीलंकेने शेवटच्या १७ चेंडूत ५९ धावा केल्या आणि विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हा नवा विक्रम आहे. यापूर्वी कोणताही संघ अशी कामगिरी करू शकला नव्हता. या सामन्यात प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाने ५ बाद १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने ६ विकेट गमावून १०८ धावा केल्या. अशा स्थितीत प्रत्येकजण श्रीलंका हरणार, असे म्हणत होते. पण सामनावीर ठरलेल्या शनाकाने स्फोटक खेळी करत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. मात्र, कांगारू संघाने ही मालिका २-१ अशी खिशात घातली. या मालिकेत ११४ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला मालिकावीर पुरस्कार मिळाला.
१७ षटकांत श्रीलंकेची धावसंख्या ६ बाद ११८ अशी होती. त्यांना १८ चेंडूत ५९ धावा करायच्या होत्या. प्रत्येक षटकात १९ धावांची गरज होती. वेगवान गोलंदाज जोस हेझलवूडने १८वे षटक टाकले. चमिका करुणारत्नेने पहिल्या चेंडूवर धाव घेतली. लाँग ऑनच्या दुसऱ्या चेंडूवर दासुन शनाकाने षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर त्याने पुन्हा त्याच ठिकाणी षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर त्याने कव्हर्सवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर लाँग ऑनवर चौकार मारला. शेवटच्या चेंडूवर धाव घेतली. अशा प्रकारे षटकात एकूण २२ धावा झाल्या. आता १२ चेंडूत ३७ धावा हव्या होत्या.
Dasun Shanaka breaks free, smashes 54 off 25 as Sri Lanka stage incredible win over Australia! 💥
Full Match Highlights: https://t.co/KSPqAKe43j#SLvAUS #CheerForLions pic.twitter.com/FEiq0yTwva
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 12, 2022
१९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दासून शनाकाने वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला डीप मिडविकेटवर षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर करुणारत्नेने कव्हर्सवर चौकार मारला. चौथ्या चेंडूवर धाव घेतली. पाचव्या चेंडूवर शनाकाने डीप मिडविकेटवर चौकार ठोकला. पुढील चेंडू वाइड. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली. अशा प्रकारे षटकात १८ धावा झाल्या. आता ६ चेंडूत १९ धावा हव्या होत्या. हे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन आला.
केन रिचर्डसनने पहिले २ चेंडू वाईड टाकले. शनाकाने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर करुणारत्नेला लेग बायच्या रूपाने एक धाव मिळाली. तिसऱ्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटवर शनाकाने चौकार मारला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर पुन्हा लाँग ऑफवर चौकार मारला. शनाकाने पाचव्या चेंडूवर षटकार मारून धावसंख्या बरोबरीत आणली. आता एका चेंडूवर एक धाव हवी होती. रिचर्डसनने वाइड टाकला. अशा प्रकारे श्रीलंकेने सामना जिंकला. त्यांनी हे लक्ष्य १९.५ षटकांत पूर्ण केले. शनाका २५ चेंडूत ५४ धावा करून नाबाद राहिला. त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. करुणारत्नेने १० चेंडूत नाबाद १४ धावा केल्या. दोघांनीही ४.१ षटकात ६९ धावांची नाबाद भागीदारी केली.
महत्त्वाच्या बातम्या –