शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; यंदा पाऊस लावणार दमदार हजेरी

अवकाळी पावसाचे ढग

यंदा एप्रिल महिन्यातच उन्हाचा पार चाळीशी पार करताना दिसत आहे. मात्र यातच शेतकरी वर्गासाठी गुड न्यूज आली असून स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस दमदार हजेरी लावणार आहे.

Loading...

सध्या वातावरणातील बदल, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरून हा अंदाज लावण्यात आला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा १०० % पाऊस यंदा पडेल.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस जून आणि सप्टेंबरमध्ये पडणार, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या महिन्यात किती पाऊस?

जून -111 %

जुलै – 97 %

ऑगस्ट – 96 %

सप्टेंबर – 101 %

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...