Skullcandy- स्कलकँडीचे ब्ल्यु-टुथ इयरबडस्

स्कलकँडी कंपनीने ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटी असणारे स्कलकँडी जिब इयरबडस् लाँच केले असून ते ग्राहकांना अमेझॉन इंडियावरून २९९९ रूपयात खरेदी करता येणार आहेत.

सध्या देशभरातील ग्राहक हे इयरबडस् अमेझॉन इंडिया या ई-पोर्टलवरून खरेदी करू शकतील. मात्र यानंतर हे मॉडेल देशभरातील विविध शॉपीजमधूनही उपलब्ध करण्यात येणार आहेत. हे मॉडेल वापरण्यासाठी अतिशय हलके आणि अर्थातच सोपे आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सहा तासांपर्यंत चालू शकते असा कंपनीचा दावा आहे. यात सहजपणे कॉल करणे वा रिसिव्ह करणे शक्य आहे. यासाठी यात उत्तम दर्जाचा मायक्रोफोनही देण्यात आला आहे.