Skin Care With Tomato | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी टोमॅटोसोबत ‘या’ गोष्टींचा करा वापर

Skin Care With Tomato | टीम कृषीनामा: टोमॅटोचा वापर प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात केला जातो. टोमॅटो जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर टोमॅटो त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतो. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामिन आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेशी संबंधित अनेक समस्या सहज दूर करतात. त्वचेवरील पिंपल्स, डाग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकतात. टोमॅटोच्या मदतीने चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी टोमॅटोचा पुढील पद्धतीने वापर करावा.

टोमॅटो आणि दही (Tomatoes and yogurt-Skin Care With Tomato)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही टोमॅटोमध्ये दही मिसळू शकतात. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळून येते, जे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला दोन ते तीन चमचे टोमॅटोच्या रसामध्ये दोन चमचे दही आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. ही पेस्ट व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याने चेहऱ्यावर काही मिनिटे मसाज करावी लागेल. दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. तुम्ही चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाचा वापर करू शकतात.

टोमॅटो आणि कोरफड (Tomatoes and Aloevera-Skin Care With Tomato)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफड आणि टोमॅटो मिक्स करून चेहऱ्याला लावू शकतो. कोरफडीमध्ये अँटिस्पेक्टिक आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्म आढळतात, जे चेहऱ्यावरील अनेक समस्या सहज दूर करतात. तुम्हाला एक चमचा टोमॅटो पल्पमध्ये एक चमचा कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून तुम्हाला हलक्या हाताने मसाज करावी लागेल. त्यानंतर पंधरा मिनिटांनी तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

टोमॅटो आणि मध (Tomatoes and honey-Skin Care With Tomato)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही टोमॅटोमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावू शकतात. कारण या दोन्हीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला दोन चमचे टोमॅटो पल्पमध्ये एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावर साधारण दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. तुम्ही या मिश्रणाचा वापर आठवडातून तीन वेळा करू शकतात. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील मुरूम, सुरकुत्या आणि डाग दूर होऊ शकतात.

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील गोष्टी वापरू शकतात. त्याचबरोबर त्वचेवरील कोरडेपणाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकतात.

मध (Honey For Dry Skin Care)

मध आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवू शकतात. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर मधाचा फेस पॅक लावू शकतात. मधाच्या फेस पॅकच्या वापराने त्वचेवरील कोरडेपणाची समस्या कमी होते आणि त्वचा चमकदार होते.

ऑलिव्ह ऑईल (Olive oil For Dry Skin Care)

त्वचेला चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने चेहऱ्यावरील कोरडेपणाची समस्या देखील कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला आंघोळीच्या अर्धा तास आधी कोमट ऑलिव्ह ऑइल चेहऱ्यावर लावून मसाज करावी लागेल. ऑलिव्ह ऑइल अंघोळीच्या आधी चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या त्वचेवरील कोरडेपणाची समस्या कमी होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Pista Milk Benefits | दुधामध्ये पिस्ता उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Skin Care | चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Hair Fall | केस गळतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स फॉलो

Gram Suraksha Yojana | ग्राम सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर

Nervousness | घबराट आणि अस्वस्थ वाटतं असेल, तर करा ‘या’ पदार्थांचे सेवन