Skin Care With Ice | बर्फाच्या मदतीने चेहऱ्यावरील ‘या’ समस्या सहज होतात दूर

Skin Care With Ice : त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत असतात. कारण प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचेच्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी तुम्ही बर्फाचा वापर करू शकतात. बर्फाच्या मदतीने चेहऱ्यावरील अनेक समस्या सहज दूर होतात. बर्फाचे तुकडे रोज चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स, सुरकुत्या, डाग इत्यादी समस्या कमी होऊ शकतात. बर्फाचा वापर केल्याने चेहऱ्याला पुढील फायदे मिळू शकतात.

चेहरा चमकदार होऊ शकतो (Skin Care With Ice)

तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढवायची असेल, तर बर्फ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला बर्फाचा तुकडा कापडामध्ये गुंडाळून घ्यावा लागेल. त्यानंतर दररोज सकाळी या बर्फाच्या कपड्याने चेहऱ्यावर हलक्या हाताने वर्तुळाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. दररोज 2 मिनिटे असे केल्याने चेहऱ्यावरील चमक वाढू शकते.

पिंपल्स कमी होऊ शकतात ( Pimples Skin Care With Ice)

तुम्ही जर पिंपल्सच्या समस्येपासून त्रस्त असाल तर बर्फ तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवीत किंवा कपड्यामध्ये बर्फ गुंडाळून घ्यावा लागेल. त्यानंतर त्याने तुम्हाला चेहऱ्यावर हलक्या हाताने दहा मिनिटे मसाज करावी लागेल. नियमित या पद्धतीचा वापर केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या नाहीशी होऊ शकते.

काळी वर्तुळे कमी होऊ शकतात ( Black Circle Eye | Skin Care With Ice)

डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी बर्फाचे तुकडे फायदेशीर ठरू शकतात. यासाठी तुम्हाला बर्फाच्या तुकड्यांमध्ये गुलाब जल आणि काकडीचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.

Eliminate puffiness, especially around the eyes.

महत्वाच्या बातम्या-