Skin Care With Herbs | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा ‘या’ औषधी वनस्पतींचा वापर

Skin Care With Herbs | टीम कृषीनामा: आजकाल प्रत्येकाला चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते. त्याचबरोबर प्रत्येकाला सुरकुत्या आणि डागांशिवाय त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन चेहऱ्याला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्यासाठी तुम्ही काही औषधी वनस्पतींचा वापर करू शकतात. या औषधी वनस्पतींचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही पुढील औषधी वनस्पतींचा वापर करू शकतात.

तुळस (Basil-Skin Care With Herbs)

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्याचबरोबर तुळशीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करू शकतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुळशीचे सेवन करू शकतात किंवा तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करून त्वचेवर लावू शकतात. नियमित तुळशीचा वापर केल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात.

दालचिनी (Cinnamon-Skin Care With Herbs)

दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे दालचिनीचा वापर अनेक औषधीमध्ये केला जातो. दालचिनीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही दालचिनीचे सेवन करू शकतात. दालचिनीचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात.

आवळा (Amla-Skin Care With Herbs)

आवळा आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, वृद्धत्वाची लक्षणे इत्यादी समस्या दूर होऊ शकतात.

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कॉफीचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

कॉफी स्क्रब (Coffee scrub-Skin Care With Coffee)

चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग खूप महत्त्वाचे असते. स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त घाण निघून जाते. कॉफीच्या मदतीने स्क्रब करण्यासाठी तुम्हाला कॉफीमध्ये साखर आणि मध समान प्रमाणात मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. तुम्हाला या मिश्रणाने हलक्या हाताने मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

कॉफी क्लिनर (Coffee cleaner-Skin Care With Coffee)

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कॉफी क्लिनरचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला कॉफीमध्ये दूध मिसळून घ्यावे लागेल. तुम्हाला दोन चमचे दुधामध्ये दीड चमचा कॉफी पावडर मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावून दहा मिनिटे राहू द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

कॉफी मालिश (Coffee massage-Skin Care With Coffee)

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी मसाज करणे खूप महत्त्वाचे असते. मसाज केल्याने चेहऱ्याला पोषण मिळते आणि त्वचा चमकदार होते. कॉफीने चेहऱ्यावर मसाज करण्यासाठी तुम्हाला दीड चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा कोरफडीचा गर आणि खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि चेहरा चमकदार होतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Hormonal Control | हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टीचा समावेश

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करायची असेल तर करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स

Mental Health | मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

Nose Redness | नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल होत असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Mahashivratri 2023 | महाशिवरात्रीला उपवास करणार असाल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो