Skin Care Tips | चेहऱ्यावरील तीळ काढून टाकायचे असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

टीम महाराष्ट्र देशा: गालांवर किंवा ओठांवर तीळ असणे हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. याला ब्युटी स्पॉट असेही म्हणतात. प्रामुख्याने नाक आणि ओठ यांच्यामधील तीळ चेहरा अधिक आकर्षक बनवते. पण जर तीळ चेहऱ्यावर जास्त प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होऊ लागतो. त्यामुळे बरीचशी लोक आपल्या चेहऱ्यावरील तीळ काढण्याचा प्रयत्न करत असतात. तीळ काढण्यासाठी लोक अनेक केमिकल युक्त प्रॉडक्ट्स वापर करतात. केमिकल युक्त प्रॉडक्ट्सच्या वापरामुळे चेहरा अधिक खराब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या सौंदर्यावर देखील होऊ शकतो. त्यामुळे केमिकल युक्त प्रॉडक्ट्स न वापरता तुम्ही घरगुती उपाय करून तीळ काढू शकतात. नैसर्गिक पद्धतीने तीळ काढल्याने शरीराला कोणतीही इजा होणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती सोप्या रुपयांबद्दल सांगणार आहोत ज्याने तुम्ही तुमचे तीळ आरामात काढू शकतात.

तीळ काढण्याचे घरगुती उपाय

एरंडेल तेल आणि बेकिंग सोडायच्या मदतीने तुम्ही तुमचे तीळ काढू शकता

चेहऱ्यावरील तीळ दूर करण्यासाठी तुम्ही एरंडेल तेल आणि बेकिंग सोड्याचा उपयोग करू शकता. हा उपाय तीळ दूर करण्यासाठी लवकर मदत करू शकतो. तीळ काढण्यासाठी 1 चमचे एरंडेल तेल घेऊन त्यात 1  चमचा बेकिंग सोडा घ्या. हे तयार झालेले मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर ते चेहऱ्यावर तसेच राहू द्या. त्यानंतर सकाळी उठल्यावर चेहरा धुवा. हे असे केल्याने तुम्हाला तीळ दूर करण्यास मदत होईल.

ॲपल विनेगरच्या मदतीने तीळ दूर करता येईल

ॲपल विनेगरचा उपयोग चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी केला जातो. ॲपल विनेगरने तुम्ही चेहऱ्यासह त्वचेवरील डाग देखील दूर करू शकतात. ॲपल विनेगरमध्ये आढळणारे मॅलिक आणि टर्टरिक ऍसिड तीळ काढण्यास मदत करू शकते. ॲपल विनेगरच्या मदतीने तीळ काढण्यासाठी कापसावर थोडासे ॲपल विनेगर घेऊन ते चेहऱ्यावर लावा. साधारण 2 ते 3 तास ते तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील तीळ दूर करता येईल.

लसणाचा वापर करून चेहऱ्यावरील तीळ दूर येऊ शकते

चेहऱ्यावरील अतिरिक्त तीळ काढून टाकण्यासाठी तुम्ही लसणाचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला लसणाच्या कळ्या सोलून त्या चांगल्या बारीक करून घ्यावे लागेल. त्यानंतर जिथे तीळ आहे तिथे त्या लसणाची पेस्ट लावून त्यावर पट्टी बांधा. ती पट्टी रात्रभर तशीच राहू द्या आणि सकाळी साध्या पाण्याने चेहरा धुवा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: गालांवर किंवा ओठांवर तीळ असणे हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. याला ब्युटी स्पॉट असेही म्हणतात. प्रामुख्याने नाक …

पुढे वाचा

Health