Share

Skin Care Tips | कॉफी फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यावर मिळतील ‘हे’ फायदे

टीम महाराष्ट्र देशा: चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी आपण नेहमी वेगवेगळ्या पर्यायाचा अवलंब करत असतो. त्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरत असतो. पण आज आम्ही तुम्हाला काही सोप्या घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत. चहा नंतर कॉफी हे पेय लोकप्रिय आहे. कॉफी पिल्याने आपल्याला नेहमी ताजेतवाने वाटते. अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. पण तुम्हाला माहिती आहे का कॉफी पिण्यासोबतच कॉफी फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्याचे आपल्या चेहऱ्याला अनेक फायदे मिळू शकतात. कसे ते जाणून घेऊया :

कॉफी फेसपॅक चे फायदे

कॉफी फेस पॅक लावल्याने त्वचेची चमक वाढते 

NBI चा रिपोर्टनुसार, कॉफीमध्ये अँटीअँक्सीडेंट गुणधर्म आढळतात जे तुमच्या त्वचेला खोलपर्यंत साफ करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. आणि त्यामुळे तुमची त्वचा चमकदार बनू शकते. तुम्ही नियमितपणे कॉफी फेसपॅक चेहऱ्यावर लावला तर तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढून त्वचा निरोगी राहील.

कॉफी फेसपॅक मुळे चेहऱ्यावरील रक्तप्रवाह सुधारू शकतो

कॉफी फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावरील चमक तर वाढतेच. पण त्याचबरोबर कॉफी फेसपॅकने स्क्रब केल्यास त्वचेवरील रक्तप्रवाह देखील सुधारू शकतो. कॉफीमध्ये असलेले कॉफीन तुमच्या त्वचेतील रक्ताच्या मायक्रोक्रिक्युलेशनला जागृत करते. आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुधारून त्वचेची चमक वाढते.

कॉफी फेसपॅकचा वापर त्वचेला मऊ बनवू शकते

कॉफी फेसपॅक चा नियमित वापर केल्याने तुमची त्वचा कापसासारखी मऊ होऊ लागते. त्याचबरोबर कॉफी फेसपॅक लावल्याने तुमची त्वचा सूनबर्न होण्यापासून वाचू शकते.

कॉफी फेसपॅक चेहऱ्यावरील डेड सेल्स कमी करते

कॉफी फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्यावरील डेड सेल्स कमी होतात. त्याचबरोबर कॉफी फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरिल अतिरिक्त तेल काढून टाकण्यास देखील मदत करते.

चेहऱ्यावर कॉफीफेस पॅक कसे लावायची ?

सर्वप्रथम कॉफी फेसपॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात कॉफी पावडर घ्या. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मध मिसळून त्याचे मिश्रण करून पंधरा मिनिटे चेहऱ्यावर त्याची मसाज करा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी आपण नेहमी वेगवेगळ्या पर्यायाचा अवलंब करत असतो. त्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now