Skin Care | फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावरील चमक कायम ठेवण्यासाठी वापरा ‘या’ गोष्टी

Skin Care | टीम कृषीनामा: चेहरा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी बहुतांश पुरुष आणि स्त्रिया फेशियल (Facial) करत असतात. त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यासाठी फेशियल केले जाते. चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी फेशियल मदत करते. त्याचबरोबर फेशियलमुळे त्वचेवरील डाग, मुरूम, सुरकुत्या इत्यादी समस्या दूर होऊ शकतात. फेशियलची चमक कायम ठेवण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. फेशियलनंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचा वापर करू शकतात. फेशियलनंतर चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा वापर करू शकतात.

विटामिन सी सीरम (Vitamin C Serum-For Skin Care)

फेशियल केल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर विटामिन सीरम लावू शकतात. विटामिन सी हे सर्व प्रकारच्या त्वचेवर काम करते. त्याचबरोबर विटामिन सी सीरम प्रदूषण आणि उन्हाच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते. याच्या मदतीने चेहऱ्यावर ओलावा टिकून राहतो. त्यामुळे फेशियलनंतर तुम्ही चेहऱ्यावर विटामिन सी सीरम लावू शकतात.

गुलाब जल (Rose water-For Skin Care)

फेशियल केल्यानंतर त्वचेवर जळजळ किंवा लालसरपणा जाणवत असेल तर गुलाब जल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. गुलाब जलच्या मदतीने त्वचा थंड राहते. त्याचबरोबर फेशियल केल्यानंतर पिंपल्स टाळण्यासाठी गुलाब जल उपयुक्त ठरू शकते. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्ही गुलाब जलचा वापर टाळायला हवा. तर दुसरीकडे तुमची त्वचा जर खूप कोरडी असेल तर गुलाब जलचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

बर्फ (Ice-For Skin Care)

फेशियल केल्यानंतर अनेकांना जळजळ आणि लालसरपणाची समस्या निर्माण होते. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर बर्फ लावू शकतात. यासाठी तुम्हाला एका कॉटन रुमालामध्ये तीन ते चार बर्फाचे तुकडे घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. याच्या मदतीने चेहऱ्यावरील लालसरपणा आणि खाज कमी होते. त्याचबरोबर चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचा फ्रेश होते.

फेशियल केल्यानंतर त्वचेवरील चमक कायम ठेवण्यासाठी तुम्ही वरील गोष्टींचा वापर करू शकतात. त्याचबरोबर चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कॉफीचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

कॉफी स्क्रब (Coffee scrub-Skin Care With Coffee)

चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग खूप महत्त्वाचे असते. स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त घाण निघून जाते. कॉफीच्या मदतीने स्क्रब करण्यासाठी तुम्हाला कॉफीमध्ये साखर आणि मध समान प्रमाणात मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. तुम्हाला या मिश्रणाने हलक्या हाताने मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

कॉफी क्लिनर (Coffee cleaner-Skin Care With Coffee)

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कॉफी क्लिनरचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला कॉफीमध्ये दूध मिसळून घ्यावे लागेल. तुम्हाला दोन चमचे दुधामध्ये दीड चमचा कॉफी पावडर मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावून दहा मिनिटे राहू द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

कॉफी मालिश (Coffee massage-Skin Care With Coffee)

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी मसाज करणे खूप महत्त्वाचे असते. मसाज केल्याने चेहऱ्याला पोषण मिळते आणि त्वचा चमकदार होते. कॉफीने चेहऱ्यावर मसाज करण्यासाठी तुम्हाला दीड चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा कोरफडीचा गर आणि खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि चेहरा चमकदार होतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Camphor And Coconut Oil | केसांना खोबरेल तेल आणि कापूर लावल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Wheat Flour | नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेण्यासाठी गव्हाच्या पिठाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care With Coffee | चेहरा स्वच्छ करण्यासाठी कॉफीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Maida Side Effects | मैद्यापासून बनलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Back to top button