एसटीच्या उत्पन्नात हिंगोली आगारात साठ टक्क्याची घट

हिंगोली : उत्पन्नात पुढे असलेली एसटी आता मात्र कोरोना काळामध्ये मोठा फटका बसला आहे. हिंगोली आगाराचे कोट्यावधींचे उत्पन्न चक्क लाखावर येवून पोहचले. कोरोना महामारीमुळे साठटक्यांनी घट झाली आहे.

चाळीस टक्के उत्पन्न आल्याने त्यातच समाधान मानावे लागत आहे. २०२० मार्च मध्ये २३ पासून लॉकडाऊन सुरु झाले. दरम्यान पाच महिने पूर्णपण बंद होते. त्यामुळे जुलै २०२० ला मालवाहतूकीसाठी एसटीला परवानगी मिळाली होती. याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, कळमनुरी, वसमत हे तीनच आगार आहेत. परंतू आता कोरोना पन्हा वाढत असताना प्रवाश्यांनी एसटीन प्रवास करणे टाळत असल्यामुळे उत्पन्न कमी झाले आहे.

हिंगोली आगाराला २०१९ ला जानेवारीत १ कोटी ४५ लाख होती. तर २०२० ला मार्च तेऑक्टोबर महिन्यात हिंगोली आगाराचे उत्पन्न लाखावर येवून थांबला आहे. कोरोनामुळे उत्पन्न नसल्याने चालक, वाहकाला याचा मोठा फटका बसत आहे. लवकर एसटी पुर्ववत होण्याची वाट येथील सामान्य नागरिक तसेच प्रवाशी देखील बघत आहेत.

महत्वाच्या बातम्या :