ध्येयवेडया तरुणाची ‘सोनेरी चतुर्भुज’ सहा हजार कि.मी सायकल जनजागृती फेरी

अक्षय पोकळे : देशात महिलांवरील अत्याचार, महिला साक्षामिकरण त्याचबरोबर वाढते प्रदूषण चिंतेचा विषय आहे. या सर्व गोष्टीना आळा कसा घालावा? यासाठी प्रत्येकजण शक्कल लढवतोय. मात्र पुण्यात यूपीएससी च्या परीक्षेची तयारी करणाऱ्यां एका धडपडी तरुणाने फक्त चर्चानमधे भाग न घेता प्रत्येक्ष समाज जनजागृती साठी स्वतः रस्त्यावर उतरून समाजात जनजागृती व्हावी यासाठी सायकल फेरी सुरु करत आहे.

Loading...

प्रितेश शशिकांत क्षीरसागर असे या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे. प्रितेश हा मुळचा खंडाळा (पारगांव) तालुक्यातील लोनंद गावचा रहिवाशी आहे. धडपडी व आशावादी प्रितेशच शिक्षण बीएससी आग्रीकल्चर मधे झाल असून सध्या तो पुण्यात स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत आहे. सध्या देशात एकूण वातावरण बदलत चालल आहे. महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय, ग्लोबल वॉर्मिंगचा विषय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याचबरोबर पर्यावरणाचा होत असलेला रहास अश्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर फक्त चर्चा न करता ‘प्रवास हा धरतीसाठी, प्रवास हा निसर्गासाठी, प्रवास हा पर्यावरण संरक्षणासाठी, प्रवास हा स्त्री संरक्षण व सन्नमानासाठी, प्रवास हा आपल्यासाठी’ या उक्तिप्रमाने प्रितेश स्वतः सायकल वरुन जनजागृती फेरी काढत आहे.

त्यामुळेच स्वतः प्रितेश १ ऑक्टोबर पासून पुणे येथील एसबी रोड येथून सायकल फेरीला सुरुवात करणार आहे. सायकल फेरीचा मार्ग पुणे-कोल्हापुर-हुबळी-बेंगलोर-चित्तोर-चेन्नई-नेल्लोर-भीरमुनिपतिनंम-कोरलम-कृष्णप्रसाद(ओडिसा)-मलीपुर-कोलकत्ता-झारखंड-औरंगाबाद(बिहार)-वाराणसी-कानपुर-आग्रा-नोइडा-दिल्ली-राजस्थान-अहमदाबाद-सूरत-मुंबई-लोनावळा-पुणे अश्या जवळपास १२ राज्यांच्या महत्वाच्या शहरांमधुन तब्बल सहा हजार किलोमीटर एवढ्या अंतराचा एकूण प्रवास असेल. दररोज जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटर आंतर पूर्ण करण्याच लक्ष आहे. त्याप्रमाणे हा पूर्ण सायकल प्रवास पन्नास दिवसांमधे पूर्ण करण्याच ध्येय ठेवण्यात आले आहे. प्रितेशला प्रायोजक कोणी नसून स्वखर्चाने व काही मित्रांच्या मदतीने ही सायकल जनजागृती फेरी तो पूर्ण करणार आहे. सायकल प्रवास करत असताना सायकलवर जनजागृतीचे फलक लावण्यात येणार आहेत.

महिला सक्ष्मीकरन व पर्यावरण रक्षण या महत्वाच्या मुद्य्यानवर समाजात जनजागृती व्हावी यासाठी मी सायकल जनजागृती फेरी काढत आहे. बारा राज्यांतुन माझा हा सायकल प्रवास असेल. या सायकल फेरीमधे मी एकटाच सहभागी होणार आहे. सहा हजार किलोमीटर अंतर पन्नास दिवसात पूर्ण करण्याची तयारी आहे. आशा आहे की यातून तरी थोडीफर जागृती होईल अशी अपेक्षा आहे.
प्रितेश क्षीरसागर
(सायकलपट्टू)Loading…


Loading…

Loading...