गुड्डया खून प्रकरणात सहाव्या संशयिताला पुण्यातून अटक

धुळे, २८ जुलै :गुडय़ा खून प्रकरणातील सहाव्या संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील दौंड येथून धुळे पोलिसांनी मोठय़ा शिताफिने ताब्यात घेतल़े अटक केलेल्या आरोपीचे नाव विक्की चावरे असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी दिली.

मंगळवार 18 जुलै रोजी पहाटे गुड्डयाचा खून झाला़ यात बंदुकीसह तलवार आणि धारदार शस्त्राचा वापर झाला होता़ ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानंतर संशयितांची नावे जाहीर करण्यात आली़ याकामी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ त्यांना मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव आदी ठिकाणी आरोपींच्या शोधासाठी पाठविण्यात आले होत़े.

विशेष पथकाने पुण्यातील दौंड येथून एका साखर कारखान्यातील कामगाराच्या निवासस्थानी लपून बसलेला विक्की चावरे यास गुरुवारी पहाटे ताब्यात घेण्यात आल़े त्याला तातडीने पोलीस बंदोबस्तात धुळ्यात आणण्यात आल़े