तोरांगणा घाटात बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू तर, ४५ जण जखमी

नाशिक : मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा खाजगी बस जवळपास २५ फुट दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या विचित्र अपघातामध्ये ६ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर ४५ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी वरून डहाणूकडे जाताना दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा भयानक अपघात झाला. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना त्र्यंबकेश्वर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची देखील शक्यता आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. परंतु या घटनेने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading...