मुंबईत शिवसेनेचा भाजपसह मनसेला जोर का झटका; मनसेचे सहा नगरसेवक सेनेच्या गोटात

udhav thackeray on bjp

मुंबई: काल झालेल्या भांडुपच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव केल्यानंतर भाजप नेत्यांनी मोठी गर्जना करत आता मुंबईचा महापौर लवकरच भाजपचा असेल अस म्हंटल. मात्र शिवसेनेन आज थेट मनसेचे सहा नगरसेवक आपल्या गळाला लावत भाजपसह राज ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.

मुंबई महापालिकेतील मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक हे आपला वेगळा गट स्थापून शिवसेनेला पाठींबा देणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या हे सहा नगरसेवक वेगळ्या गटाची नोंदणी करण्यासाठी कोकण आयुक्त कार्यालयात पोहचले आहेत. एकूणच सर्व चित्र पाहता शिवसनेनेकडून मास्तरस्ट्रोक लगावत एकाच दगडात मनसे आणी भाजपला घायाळ करण्यात आल आहे.