राम जन्मभूमी वाद; श्री श्री रवीशंकर यांच्या नावाला निर्मोही आखाड्याचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा : अयोध्येतील रामजन्मभूमी वाद हा मध्यस्थामार्फत सहमतीने सोडवावा असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासाठी त्रीसदस्यीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. वरिष्ठ वकील श्रीराम पांचू व आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांचा या त्रीसद्स्सीय समितीत समावेश करण्यात येणार आहे.

दरम्यान,निर्मोही आखाड्याचे महंत सीताराम दास यांनी अयोध्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या मध्यस्थांच्या समितीत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. मध्यस्थांच्या यादीत घटनात्मक व्यक्तीचेच नाव असावे असे आम्हाला वाटते असे महंत सीताराम दास यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.