‘सीता प्रत्येक युगात अग्निपरीक्षा देणार नाही’-करुणा मुंडे

karuna munde

औरंगाबाद – राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनजंय मुंडे यांच्याविरोधात एका तरुणीने अत्याचाराची तक्रार दिली आहे. यामुळे खळबळ उडालेली आहे. पण मुंडेंनी हे आरोप फेटाळत आपण एका महिलेसोबत परस्पर संमतीने संबधात होतो अशी माहिती सोशल मीडियातून दिली आहे. आता ती महिला कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचा खुलासाही धनजंय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. तिचे नाव करुणा असल्याचे मुंडेंनी सांगितले. शिवाय तिच्यापासून झालेल्या दोन अपत्यांना मुंडे यांनी स्वत:चे नाव दिल्याचेही कबुल केले.

फेसबुकवर करुणा धनजंय मुंडे या नावाने एक अकाऊंट आहे. ती अकांऊटधारक व्यक्ती स्वत:ला धनजंय मुंडे यांची पत्नी मानते. करुणा नामक महिलेने त्याद्वारे अनेक पोस्ट प्रसिद्ध केल्या आहेत. विविध पोस्ट आणि त्यात असलेल्या माहितीवरून ते अकाऊंट करुणा यांचेच असावे असे जाणवते. मात्र, अधिकृतरित्या ते खाते करुणा मुंडे यांचेच आहे की नाही याबाबत अस्पष्टता आहे.

धनजंय मुंडे यांच्यावरील अत्याचार तक्रारीनंतर संबधित अकाऊंटवरून एक पोस्ट प्रकाशित करण्यात आली आहे.

यात फक्त ”सीता हर युग में अग्नि परीक्षा नहि देगी” असा मजकूर लिहिण्यात आला आहे. यावरून बहिणीने दिलेल्या तक्रारीला करुणा यांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान,धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप असल्याने त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा हक्क नाही. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे. आता या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील मुंडेंवर निशाणा साधला आहे. ‘तक्रार करणारी महिला आणि धनंजय मुंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते संबंधात असलेली महिला दोघीही एकाच घरात रहातात मात्र मोठी बहीण यावर काहीच बोलत नाही. तिची मोठी बहीण याप्रकरणी का बोलत नाही?’असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या