बिनबुडाचे आरोप करत बसण्यापेक्षा समोरा समोर बसून आमच्याशी खुली चर्चा करा : जगताप

करमाळा – बागल गटाकडून आमच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र नेमका कशात भ्रष्टाचार केला हे ते सांगत नाहीत बिनबुडाचे आरोप करत बसण्यापेक्षा समोरा समोर बसून आमच्याशी खुली चर्चा करा असं खुलं आव्हान माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बागल यांना दिलं आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी देशभक्त नामदेवराव जगताप शेतकरी विकास पॅनलच्या जाहीर सभेत साडे येथे ते बोलत होते.आमच्यावर संस्कार नसल्याचा आरोप बागल गटाकडून केला जातो मात्र त्यांनी भ्रष्टाचारी बागल गटाने आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देखील त्यांनी दिला.

करमाळा तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून सत्ताधारी जगताप गटाबरोबर आमदार पाटील तसेच मोहिते पाटील गटाने युती केली आहे.तर या युती समोर बागल आणि संजय शिंदे यांच्या गटाने आव्हान निर्माण केल्याने सध्या तिरंगी लढत पहायला मिळत आहे.प्रचारात जगताप गटाने आघाडी घेतली असून सभांना देखील मोठी गर्दी पहायला मिळत आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील, खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने जयवंतराव जगताप यांच्या सोबत युती केल्याने या तिघांच्या देशभक्त कै. नामदेवराव जगताप शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी करमाळा तालुक्याचे आराध्यदैवत कमलाई मातेचं नाव साखर कारखान्याला दिले मात्र त्या कारखान्याचे खरे नाव विठ्ठल साखर कारखाना असून राजकारण करण्यासाठी देवीच्या नावाचा वापर केला असल्याची टीका आमदार नारायण पाटील यांनी केली.

जयवंतराव जगताप यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर लगेच १९४८ साली शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल व्हावे. त्यांच्या रक्ताचं चिज व्हावं या साठी बाजार समितीची स्थापना केली.

– मार्केट कमिटीच्या निवडणुकीशी त्यांना काही घेणं देणं नाही.मी सोबत असल्याने 2019 ला आबांना लोकं साथ देतील ही भीती बागल गटाला वाटत आहे.
– २००४ साली आदिनाथचा चेअरमन असताना जिल्हयात सर्वाधिक १२०१ रु. भाव दिला.

– आमच्यावर संस्कार नसल्याचा आरोप बागल गटाकडून केला जातो मात्र त्यांनी भ्रष्टाचारी बागल गटाने आत्मपरीक्षण करावं.
– समोरा समोर बोलवून विकासाच्या मुद्द्यावर आमच्याशी खुली चर्चा करा मी त्यांना जाहीर आव्हान देतो.
– सव्वा कोटी खाल्ल्याचा आरोप आमच्यावर केला जातो मात्र कशात खाल्ले हे ते सांगत नाहीत.
– दिलीप सोपल सारखी माणसं चौकशीत दोषी आढळले माझ्यावर एकही आरोप नाही.
– कार्यकर्त्यांचा संयम सुटला तर अवघड होईल असं रश्मी बागल सांगत आहेत मात्र तुमच्या मागे आज कुत्रं सुद्धा नाही .
– वयक्तिक काम आम्ही करत नसल्याने गट सोडून काहीजण जात आहेत.
– आम्ही राजकारण दुकानदारी म्हणून केली असती तर तालुक्यात आम्हाला विरोधक कोणी तयार झालं नसतं.