नवलेंना दणका ; सिंहगडच्या विश्वस्थ पदावरून हटवले

टीम महाराष्ट्र देशा : अभियांत्रिकीसह अन्य तंत्रशिक्षणाची डझनभर महाविद्यालये चालविणाऱ्या पुणे येथील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एम. एन. नवले यांना आता विश्वस्त पदावरून हटवले आहे. एखाद्या संस्थेच्या विश्वस्तास न्यायालयाकडून शिक्षा ठोठावल्यानंतर आणि संबंधित व्यक्तीला तुरुंगात कारावास भोगावा लागला तर अशा व्यक्तीचे विश्वस्तपद रद्द करण्याचा अधिकार धर्मदाय आयुक्त कार्यालयाला आहे.त्यामुळेच नवले यांना विश्वस्थ पदावरून दूर व्हावे लागले आहे.

Loading...

एम. एन. नवले हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.कधी मुलाच्या शाही लग्नावरून तर कधी कर्मचाऱ्याच्या थकीत वेतनामुळे नवले राज्यभर चर्चेत आले.त्याच नवलेंना विभागीय आयुक्ताकडून चांगलाच हादरा मिळाला आहे.पुणे विभागाचे सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.Loading…


Loading…

Loading...