सिंहगड किल्ला १ महिना पर्यटकांसाठी बंद असणार

टीम महाराष्ट्र देशा : पुणे येथील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरड कोसळण्याच्या घटना सतत घडत असल्याने हा निर्णय पर्यटन विभागाकडून घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीपासून दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्यामुळे पर्यटक देखील घाबरले होते. मात्र आता डागडुजी केल्याशिवाय पर्यटकांना गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ओक्टोबर या महिन्यांमध्ये पर्यटकांची सिंहगडावर मोठी गर्दी पाहायला मिळते. तसेच आसपासच्या परिसरात काही अॅडव्हेंचर पार्क असल्याने नागरिक या महिन्यांमध्ये सिंहगडावर जाण्यास गर्दी करतात. मात्र पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या भीतीने हा निर्णय घेणे गरजेचे आहे. आता १ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत गडाची आणि जाण्याच्या वाटेची डागडुजी केली जाईल तसेच चालण्यायोग्य रस्ता बनविला जाईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल आणि गडाचे संवर्धन देखील होण्यास मदत मिळेल. वर्षातून एकदा महाराष्ट्रातील किल्ल्यांची डागडुजी होणे गरजेचे आहे. मात्र पर्यटकांच्या सततच्या गर्दीने हा निर्णय घेता येत नव्हता मात्र आता १ महिन्यासाठी या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे.

गड १ महिना बंद आहे असे सांगण्यात आले असले तरी देखील काम जास्त दिवस चालले तर हा कालावधी वाढू देखील शकतो त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

महत्वाच्या बातम्या

Loading...