‘मला ‘पद्मश्री’ देऊन केंद्र सरकारने लतादीदींची इच्छा केली पूर्ण’

टीम महाराष्ट्र देशा : ‘ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, सुरमयी अखियों मे, ऐ जिंदगी गले लगा ले, यासारख्या अप्रतिम आणि अशा असंख्य गाण्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आपल्या गाण्यांनी सुरमयी करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मनाचा पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर सुरेश वाडेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, मला पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारने लता दिदींचीच कित्येक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण केल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली आहे.

Loading...

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या नावाचा पद्म पुरस्कारासाठी विचार व्हावा, यासाठी दीदी गेली 20 वर्ष न चुकता केंद्र सरकारला पत्र लिहीत होत्या, असे सुरेश वाडकरांनी सांगितले. मात्र, दरवेळी काही ना काही कारणामुळे वाडकर यांना या पुरस्कारापासून वंचित रहावे लागले, अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, आज हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला माझे आई वडील, माझे गुरू जियालाल वसंत आणि दिवंगत संगीतकार रवींद्र जैन यांची विशेष आठवण येत असल्याचे सुरेशजी म्हणाले. सुरेश वाडेकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 रोजी कोल्हापुरात झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी गुरु पंडित जियालाल वसंत यांच्याकडून संगीताचं शिक्षण सुरु केलं. सुरेश वाडेकर यांचा विवाह 1988 मध्ये पद्मा यांच्याशी झाला. पद्मा वाडकरही प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात