मुंबई:राज्यातील राजकीय घडामोडीमुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचाच पक्षातील आमदारांनी धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंचा उजवा हाथ समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी सेनेशीच बंड पुकारला आहे. त्यांच्याबरोबर सेनेचे एकूण ५० आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना प्रसिद्ध गायक लकी अली (Lucky Ali) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राज्यकारभाराचे अगदी मोजक्या शब्दात पण स्पष्टपणे कौतुक केले आहे.
“मला उद्धव ठाकरे आणि त्यांचा राज्यकारभार आवडतो…पूर्णविराम”, अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. लकी अली नेहमीच चालू घडामोडींवर आपले मत व्यक्त करत असतात. सध्याच्या राज्यातील परिस्थितीवरही त्यांनी आपले मत मांडले आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगला सोडला आहे. शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडीमधीलही अनेक मतभेत, खुलासे समोर येत आहे. सध्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत असल्याची भूमिका मांडली आहे. मात्र येणाऱ्या काही दिवसात राजकारणात मोठा भूकंप होणार हे मात्र नक्की आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Bhaskar Jadhav : नॉट रिचेबल भास्कर जाधव गुवाहाटीला गेल्याची चर्चा फेटाळली
- Nilesh Rane : “ठाकरे सरकारची ‘या’ दोन शब्दांनी वाट लावली”, निलेश राणेंचा टोला
- VIDEO : सराव सामन्यात विराट कोहली पंचांवर नाराज; जाणून घ्या नेमकं घडलं काय!
- Hemangi Kavi : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर हेमांगी कवीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…
- Devendra fadanvis : बंडापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा?