मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पायाचं दुखणं वाढल्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. गेल्या महिन्यात लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आहे.
दरम्यान आज ख्यातनाम पार्श्वगायिका आशाताई भोसले यांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ख्यातनाम पार्श्वगायिका श्रीमती आशाताई भोसले यांनी शिवतीर्थ निवासस्थानी त्यांची भेट घेतली.#MNSAdhikrut pic.twitter.com/LGEl2KQlbP
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 21, 2022
देवेंद्र फडणवीस -राज ठाकरे ठाकरे भेट-
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी अनेक तर्क-वितर्क लावले गेले. मात्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असल्याचे स्पष्ट केले होते. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. तर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांना कौतुक करणारे पत्रही पाठवले होते.
महत्वाच्या बातम्या:
- Rupali Patil : चित्रा वाघ यांचं डोके ठिकाणावर आहे का ?; रुपाली पाटलांचा संतप्त सवाल
- Chitra Wagh | मला घाण भाषेत बोललं जात आहे, मेसेज केले जात आहेत – चित्रा वाघ
- एकदाचं ठरलं! श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे ‘या’ देशात खेळवला जाणार आशिया चषक; जाणून घ्या…!
- Sushmita Sen | सुष्मिता सेनच्या चष्म्यातून दिसल्या दारूच्या बाटल्या; नेटिझन्सचे केले टार्गेट
- IND vs WI : बीसीसीआयने खेळाडूंसाठी चार्टर्ड फ्लाइटवर खर्च केले ‘इतके’ कोटी रुपये; वाचा!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<