fbpx

अरूण दाते यांच्या निधनामुळे संगीतातील ‘शुक्रतारा’ निखळला! : विखे पाटील

vikhe patil

मुंबई- ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील ‘शुक्रतारा’ निखळल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

दाते यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, अरूण दाते यांनी संगीत क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ प्रवासात रसिकांना दिलेला गाण्यांचा गोडवा चिरंतन स्मरणात राहिल. दाते यांनी मराठी भावगीतांमधून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या सुमधूर आवाजातील मराठी भावगीतांनी रसिकांच्या ह्रदयात पटकावलेले अढळ स्थान, हीच त्यांच्या संगीत सेवेला मिळालेली खरी दाद आहे. ‘या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असा संदेश देणाऱ्या अरूण दातेंच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सांगून विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.