इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया

अहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदुरीकर) यांनी “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे विधान ओझर येथे झालेल्या किर्तनात त्यांनी केलं. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

याच पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांवर सिंधुताई सपकाळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत त्या अहमदनगर मध्ये माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘इंदुरीकर हे चांगले व्यक्ती आहेत,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Loading...

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून बोललं गलं असेल असं मत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळांनी व्यक्त केलं आहे. तसेच दोन तासांच्या कीर्तनातून एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो,’ असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदुरीकर महाराजांचं समर्थन केलं आहे.

दरम्यान, या वादावर संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी टीका केली आहे.’कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. त्यात इंदुरीकरांचं कीर्तन बसत नाही. त्याचबरोबर त्यांचे विनोदही कमी दर्जाचे असतात. तसेच इंदोरीकरांवर चर्चा यापूर्वीच व्हायला हवी होती. कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. त्यात इंदोरीकरांचं कीर्तन बसत नाही. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकोबा यांचा तर आपण इंदोरीकरांसारखं कीर्तन करताना विचार करू शकत नाही.असे परखड मत डॉ. मोरे यांनी मांडले आहे. अपल्या फेसबूक पोस्टमधून त्यांनी इंदुरीकर यांच्यावर भाष्य केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....