fbpx

सिंधुदुर्ग : पुढचा आमदार आमचाचं – दत्ता सामंत

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. या निवडणुकीत सेना भाजप व इतर तीन पक्ष एकत्र येऊनही स्वाभिमानाला मिळालेली मते निश्चितच देखणी आहेत. मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत सेनेच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली घट ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांसाठी धोक्याची घंटा आहे, असे सुतोवाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दत्ता सामंत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, माजी जि.प.अध्यक्ष विकास कुडाळकर, सभापती पंकज पेडणेकर, आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत पक्षाला योग्य निशाणी मिळाली नाही तसेच निशाणी लोकांपर्यंत पोहचविण्या साठी आम्हाला खूप कमी कालावधी मिळाला म्हणून आमचा पराभव झाला. परंतु आम्ही धाडस केले. पण आमची मते वाढली हा आम्हाला फायदा झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात स्वाभिमान पक्षाचा आमदार निवडून येणारच यात शंका नाही. सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी आमच्या पक्षाकडे ४ ते ५ सक्षम उमेदवार इच्छुक आहेत. त्यातील राणे साहेब योग्य तो उमेदवार जाहीर करतील, त्यांचा आदेश अंतिम मानून पक्षासाठी सर्व प्रामाणिकपणे काम करतील, असे दत्ता सामंत म्हणाले.