राणेंच्या कामाचा धडाका पाहून मी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला- माधुरी गायकवाड

कणकवली – शहराच्या नगराध्यक्षा व संदेश पारकर गटाच्या समर्थक माधुरी गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत माधुरी गायकवाड आणि त्यांचे पती सोमनाथ गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. या वेळी तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, शहराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे आदी उपस्थित होते.माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर, कामाचा धडाका पाहून मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाने संधी दिली, तर यंदाची नगरपंचायत निवडणूकही लढविणार असल्याचे सौ. गायकवाड म्हणाल्या.

bagdure

२०१३ ची नगरपंचायत निवडणूक राणे आणि पारकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर एकत्रितपणे लढवली आणि बहुमताचे १३ सदस्य संख्याबळ निवडून आले; मात्र सन २०१५ मध्ये झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत संदेश पारकर यांनी राणेंना धक्का दिला. विरोधी पक्षांच्या साहाय्याने आपल्या गटाचा नगराध्यक्ष नगरपंचायतीवर बसवला. यात माधुरी गायकवाड यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती; मात्र त्यांनी संदेश पारकर यांची साथ सोडून आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला होता. नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार संदेश पारकर यांना हा धक्का मानला जात आहे.

काय म्हणाल्या माधुरी गायकवाड
माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर, कामाचा धडाका पाहून मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या अडीच वर्षांत मी सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला; परंतु सहकाऱ्यांकडून सतत आकसाचे राजकारण खेळले जात होते. विरोधकांची कामे करू नका, असे सांगितले जात होते. या सर्वाला कंटाळून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्याचा निर्णय घेतला.शहरातील कुठल्याही नागरिकाचे काम करताना त्याचा पक्ष पाहिला नाही; पण माझे नगरपंचायतीमधील सहकाऱ्यांचे ज्यांच्याशी संबंध चांगले नसतील, त्यांची कामे करू नका, असा दबाव येत होता. याखेरीज विरोधी नगरसेवकांचीही कामे करण्याबाबत सहकारी आक्षेप घेत होते.’’

You might also like
Comments
Loading...