मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा बँकेवर भाजपने आपला झेंडा फडकला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे वर्चस्व पणाला लागले होते.
अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक चांगलीच गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. परंतु, त्यांच्या अधिकृत फेसबुक पेसवरुन निवडणूक निकालांबाबक एक पोस्ट करण्यात आल्याचे दिसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. सतीश सावंत यांच्या पराभवानंतर नितेश राणे यांनी केलेल्या पोस्टवरुन आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
कणकवलीमध्ये अटीतटीच्या लढतीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली. या दोघांनी ईश्वर चिठ्ठीने निकाल जाहीर केला आणि नशिबाची साथ भाजपच्या विठ्ठल देसाईंना मिळाली. या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर नितेश राणेंच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन ‘गाडलाच’ या आशयाची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला-चंद्रकांत पाटील
- सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- ‘वस्तू व सेवाकर परिषद’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
- “धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती…”, निलेश राणेंची विजयावर प्रतिक्रिया
- राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु; जाणून घ्या काय आहेत नवे निर्बंध
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<