नारायण राणेंना कॉंग्रेसचा ‘दे धक्का’; सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारणी बरखास्त

narayan rane

वेबटीम: गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याचेच पडसाद सध्या कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारण पहायला मिळत आहेत. आता कॉंग्रेसने नारायण राणेंच्यावर कुरघोडी करत समर्थक जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे, तसेच पक्षाचे निष्ठावंत विकास सावंत यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात कॉंग्रेस खासदार हुसैन दलवाईं यांनी घेतलेली काँग्रेसची सभा राणे समर्थकांनी उळधून लावण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आमदार नितेश राणे यांनी भरसभेत दलवाईं आणि इतर कॉंग्रेस नेत्यांना झापल होत. याच सर्व गोष्टीमुळे कॉंग्रेसने राणेंच्या कुरघोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मोठे खांदेपालट केले असल्याच बोलल जात आहे.