विजेतेपदाची संधी हुकली, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव

टीम महाराष्ट्र देशा :  स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचा इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत पराभव झाला. त्यामुळे इंडोनेशियन ओपन ग्रां. प्रि. स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची तिची संधी हुकली आहे. जपानच्या अकाने यामागुचीने तिचा पराभव केला.

पी. व्ही. सिंधूने चेन युफेई हिच्यावर सरळ गेममध्ये मात करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीकडून १५ -२१ , १६ -२१ असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, या लढतीत यामागुची हिने सुरुवातीपासूनच जोरदार खेळ करत सिंधूवर दबाव राखला. त्यामुळे पहिल्या गेम गमावल्यानंतर दुसर्या गेममध्येही यामागुचीने दबाव कायम राखत सिंधूला विजेतेपदापासून दूर ठेवले.