भारताच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला जाणार नाही – नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

सिंधू पाणी करारात भारताच्या हक्काचे पाणी पाकिस्तानात वाहून जात आह. यापुढे प्रत्येक थेंब पाणी थांबवून पंजाब, जम्मू काश्मीरमधील शेतक-यांसाठी आणणार आहे. भारताच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला जाणार नाही. ‘भारतातील पाणी आपल्या शेतकऱयांना पुरेपुर मिळालेच पाहिजे. माझ्या शेतकऱयांना पाणी मिळालेच पाहिजे. पाकिस्तानला पाणी दिले जाणार नाही.

काय आहे सिंधू नदी पाणीवाटप करार?

*वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनंतर साठच्या दशकात हा करार झाला.

*ज्यानुसार सिंधू खोऱ्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले. सतलय, बियास, रावी, या पूर्व खोऱ्यात तर सिंधु, झेलम, चिनाब या पश्चिम खोऱ्यात येतात.

*यातल्या पूर्व खोऱ्यातल्या नद्यांचं पाणी हवं तितकं वापरण्याचा अधिकार भारताला आहे.

*पश्चिम खो-यातल्या पाण्यावर मात्र काही बंधनं आहेत. पश्चिम खो-यातलं पाणी हे पाकिस्तानला जातं.