fbpx

सिंधू सामना हारल्याची खंत; पण प्रयत्न केल्याचा अभिमान : पी व्ही रमण

PV Raman

नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सिंधू अंतिम सामन्यात पराभूत झाली या गोष्टीची खंत वाटते. पण सिंधूने सामना जिंकण्याचे पूर्ण प्रयत्न केले, या गोष्टीचा मला अभिमान आहे, असे गौरवोद्‌गार सिंधूचे वडील पी व्ही रमण यांनी काढले.

जपानच्या नोझोमी ओकुहरा हिचा अनुभव दांडगा आहे. तिने आधीच्या सामन्यात सायना नेहवालला पराभूत केले होते. पण तरीदेखील सिंधूने स्वत:वर विश्वास ठेवत निकराची झुंज दिली आणि शेवटपर्यंत प्रयत्न सुरू ठेवले. म्हणूनच सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले, तरीही सिंधूने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे, असेही पी व्ही रमण म्हणाले.