fbpx

अधिकारी उपस्थित नसल्याने शिवसेनेने खुर्चीवर डुक्कर बसवून केले आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : दुपारी बारा वाजेपर्यंत पंचायत समितीच्या कार्यालयात एकही अधिकारी नसल्याने शिवसेनेने गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीवर डुक्कर बसवून निषेध केला. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ही घटना आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वात हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

बुधवारी सेनगाव पंचायत समिती कार्यालयात काही ग्रामस्थ गटविकास अधिकाऱ्यांची वाट पाहत बसले होते. बराच वेळ झाला तरी ते आलेच नाही, त्यावेळी आलेल्या ग्रामस्थांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी पंचायत समिती कार्यालय गाठले.

दरम्यान दुपारी बारा वाजेपर्यत एकही अधिकारी नसल्याचे बघून देशमुख संतापले, त्यनंतर संतापलेल्या देशमुख यांनी गटविकास अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीवर डूक्कर बसवून आंदोलन केल, इतकेच नव्हे तर, एकही जबाबदार अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गटविकास अधिकाऱ्यासह, गटशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी यांच्या खुर्चीवर देखील डूक्कर बसवून निषेध केला.