fbpx

महारेशीम अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्व तालुक्यात रेशीम उद्योग योजनेची रथाव्दारे माहिती मिळणार

सांगली  : महारेशीम अभियानांतर्गत जिल्ह्यात रेशीम उद्योग योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रेशीम रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी वि. नायांनी या अभियानास शुभेच्छा देवून जिल्ह्यात रेशीम उद्योगाचा विस्तार व विकास योग्य प्रकारे करावा अशा सूचना दिल्या. रेशीम उद्योग योजनेचा प्रचार व प्रसार संपूर्ण राज्यात व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयामार्फत संपूर्ण राज्यात दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत बार्टी संस्थेच्या सहाय्याने महारेशीम अभियान रथाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रेशीम उद्योग योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी रेशीम रथ सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून दि. 30 नोव्हेंबर 2017 अखेर पर्यंत फिरणार आहे. तसेच या कालावधीत रेशीम उद्योगासाठी नवीन शेतकऱ्यांची नोंदणीही करण्यात येणार आहे.