‘या’ कारणासाठी नगर जिल्ह्यातील कोपर्डीत पुन्हा मूक मोर्चा!

kopardi

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोपर्डी येथील समाधान शिंदे यांच्यावर ट्रॅक्टर चोरीचा खोटा संशय घेऊन त्याना मारहाण करण्यात आली. घाबरल्यामुळे आणि आरोप सहन न झाल्याने समाधान शिंदे यांने आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.

त्यामुळे कर्जत तालुक्यातील कोपर्डीत पुन्हा एका आंदोलने सुरू झाली आहेत. उपोषणानंतर आता मूक मोर्चाही काढण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यासह विविध संघटनांतर्फे आंदोलने सुरू आहेत.

दहा नोव्हेंबरला ही घटना घडली आहे. ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे कुटुंबीय आणि नातलगांनी घरासमोरच उपोषण केले. शिंदे कुटुंबीय व कोपर्डीतील बौद्ध समाजाच्या वतीने उपोषण करण्यात आले आहे.

आंदोलनात समाधान यांचे पक्षाघात झालेले वडील रमेश शिंदे, वयोवृद्ध आई ताराबाई, पत्नी रंजना दोन चिमुकली मुले, भाऊ बाळू शिंदे यांच्यासह गावातील बौद्ध समाजाचे नागरिक सहभागी झाले आहेत. भाऊ बाळू शिंदे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गणेश नारायण मोरे, धनंजय बबन गुंड व काका ज्ञानदेव सुद्रिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मयत समाधान शिंदे यांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ मदत द्यावी व आरोपींना अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिला आहे. शिंदे त्यांच्यावर अन्याय झाला आहे.

यापूर्वी देखील कोपर्डी गाव देशात गाजले होते. यामुळे हा विषय गांभीर्याने घेऊन पोलीस व प्रशासनाने उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशाराही सुनील साळवे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या