पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचा मूक मोर्चा

pune mpsc student

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं तीन वर्षांत केवळ ६९ जागांची जाहिरात काढल्यामुळे पुण्यातील स्पर्धा परीक्षेच्या मूक मोर्चा काढला आहे. या मोर्चाव्दारे विद्यार्थांनी शासनाचे लक्ष खेचण्याचा प्रयत्न केला. पुण्यात शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात आलेले सर्व विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थांनी त्यांच्या अनेक मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत. स्पर्धा परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची तपासणी सीबीआय मार्फत करण्यात यावी तसेच राज्यसेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी. अश्या मागण्या घेत विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत.

काय आहेत विद्यार्थांच्या प्रमुख मागण्या ?

१) राज्यसेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी
२) संयुक्त परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणे PSI/STI/ASO ची स्वतंत्र परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी
३) MPSC ने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात यावी
४) MPSC ने परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसवावेत
५) राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावावी
६) MPSC ने तामिळनाडू पॅटर्न राबवावा
७) तलाठी पदाची परीक्षा MPSC द्वारे घेऊन जास्तीत जास्त पदांची जाहिरात काढावी
८) MPSC ने C-SAT या विषयाचा पेपर UPSC च्या धर्तीवर पात्र करावा
९) स्पर्धा परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची तपासणी सीबीआय मार्फत करण्यात यावी
१०) आयोगाकडून जे प्रश्न चुकतात आणि रद्द करण्यात येतात त्याचे आयोगाने संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे
११) राज्य आणि जिल्हा पातळीवरील रिक्त जागा भरण्यात याव्यात