सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘दगडूशेठ गणपती’ ची आरती

patil

पुणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुण्यामध्ये सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. दगडूशेठ हलवाई ट्रस्ट च्या माध्यमातून सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक कामांचा वाढता आलेख आहे. त्यामुळे यामाध्यमातून सामाजसेवेचे हे व्रत असेच सुरु रहावे. भारतीयांचे कल्याण होवो, ही गणपती बाप्पाचरणी एकच प्रार्थना आहे, अशी भावना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित उत्सवात पाटील यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.